पोस्ट्स

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील महत्वाच्या तरतुदी

महाराष्ट्र नागरी  सेवा (रजा) नियम 1981 मधील महत्वाच्या तरतुदी रजेची सर्वसाधारण तत्वे 1. रजा हक्क म्हणून मागता येत नाही (नियम 10) 2. रजा मंजूर करणारा सक्षम अधिकारी प्राधिकारी लोकसेवेच्या निकडीमुळे रजा नाकारु शकतो किंवा रद्द करु शकतो.  (नियम 10) 3. रजा मंजूर करणा-या प्राधिका-यास कर्मचा-याने मागितलेल्या रजेचा प्रकार बदलता येत नाही. त्यासाठी कर्मचा-याची लेखी विनंती असली पाहिजे.  (नियम 10) 4 . कर्मचारी सेवेत असताना त्याच्या विनंतीवरुन भूतलक्षी प्रभावाने एका प्रकारच्या रजेचे दुस-या प्रकारच्या रजेत परिवर्तन करता येते. मात्र त्यावेळी तशी रजा अनुज्ञेय असली पाहिजे. रजेच्या परिवर्तनामुळे जादा देण्यात आलेल्या रकमेची वसुली केली जाते किंवा थकबाकीची रक्कम दिली जाते. (नियम 4) 5. अनुपस्थितीचा कालावधी भुतलक्षी प्रभावाने असाधारण रजेत परिवर्तीत करता येतो. अशा प्रकारची रजा ही उपभोगण्यापुर्वी अर्ज करुन मंजूर करुन घेतली जात नाही. अनुपस्थिती नियमित करण्यासाठी ही रजा नंतर मंजूर केली जाते.  (नियम   63(6)) 6. कोणत्याही प्रकारची रजा सतत 5 वर्षाहून अधिक कालावधीकरीता मंजूर करता य...
अलीकडील पोस्ट